कडयावरून घसरल्याने शिवशाही ट्रेकिंग ग्रुपचे ६ जण जखमी
पुणे – थंडीचा कडाका वाढल्याने ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी पहाटेच बाहेर पडत आहे. मात्र पहाटेच्या धुक्यामुळे ट्रेकिंग करणाऱ्या लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक ट्रेकर्सची चिंता वाढवणारी घटना सोमवारी पहाटे ५ वाजता घडली. २४ जनांपैकी यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत.
वाढलेल्या गाराठ्यामध्ये धुक्याचे प्रमाणही वाढले आहे, परिणामी दृश्यामनता कमी हॉट आहे. ९ जानेवारी रोजी पहाटे २४ जणांचा ग्रुप राजगड ते तोरणा असा ट्रेक करायला गेला होता. मात्र दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रेकर्स ग्रुप मधील सर्व सदस्य कड्यावरून पाय निसटून चाळीस फूट घसरत गेले. सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली आहे. शिवशाही ट्रेकर्स मध्ये अखलेश सिंग , प्रसाद गाडेकर, संतोष गुप्ता, मनोज भावसार व इतिहास लेखक अमर दांगट यांच्यासह २४ जण होते.
दरम्यान, गडाखालील गावातील लोकांनी पर्टकांना भल्या पहाटे न येता थोडंसं उजाडले की येण्याचा सल्ला दिला तसेच सोबत उत्तम बॅटरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. .
