Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

यशासाठी ध्येयासक्ती, सातत्य व संघर्षाची तयारी हवी – प्रा. नितीन बानगुडे पाटील

पिंपरी  : “डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे ध्येय उराशी बाळगून तुम्ही अभ्यास करत आहात. अशा आव्हानात्मक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर ध्येयासक्ती, अभ्यासातील सातत्य व संघर्षाची तयारी असायलाच हवी. इतर विचार सोडून ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास आभाळही ठेंगणे होईल,” असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखा मार्गदर्शक तुमच्यासोबत असल्यावर यश हमखास मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयआयबी पुणे शाखेच्या वतीने ‘आयआयबी-इन्स्पायर’ कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे पाटील हजारो विद्यार्थ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करत होते.  या कार्यक्रमावेळी आमदार महेशदादा लांडगे, निवृत्त मुख्य न्यायाधीश एन. एस. लोहारे, कामगार नेते सचिन लांडगे, मा. उपमहापौर तुषार  हिंगे, माजी उपमहापौर नानी घुले,  समीर मासुळकर,  दिनेश यादव, डॉ. प्रकाश गुरुतवाड, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून आपण खंबीर असलो की, सर्वकाही शक्य होते. मनापासून प्रयत्न कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. मला डॉक्टर व्हायचे होते; पण योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला मात्र आज ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखी ‘डॉक्टर बनवणारी फॅक्टरी’ तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि त्यांची साथ एकत्रित झाली, तर देशाला चांगले डॉक्टर मिळतील.”

या वर्षीची १० वीमधून ११ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २२ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यामधे गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिषवृती मिळेल. ‘आयआयबी महाफास्ट’ या उपक्रमातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, त्यातून यशस्वी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे, असे संचालक डॉ. महेश पाटील यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading