झोपडपट्टीधारकांचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करा- यशवंत नडगम
पुणे : .पुणे शहरातील आनंदनगर मार्केट यार्ड परिसरातील झोपडपट्टी धारकांचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करा अन्यथा अतिशय तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा दलीत पँथर चे प्रदेशाध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला आहे .
आज डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुढे पुणे महापालिका असा मोर्चा दलीत पँथर च्या वतीने काढण्यात आला .यावेळी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व पुणे महापालिका आयुक्त यांना देण्यात आले . मोर्चाचे नेतृत्व दलीत पँथरचे प्रदेशाध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .या आंदोलनात यावेळी पुणे शहरातील मनोज माने ,स्नेहाताई माने ,आकाश पायाळ, अमोल पवार ,सुषमा कांबळे ,जेम्स विनोद ,सुरेश पवार ,जॅक्सन अँथोनी , यासह पुणे शहरातील महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
