fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

उर्फी जावेद म्हणतेय ‘… चित्रा मेरी सासू’

मुंबई : टीव्ही स्टार उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही संपायच नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. “चित्रा वाघने मुझे सुधार दिया ..,  डीपी मेरी ढासू… चित्रा मेरी सासू “, असे म्हणत उर्फी जावेदने नवीन ट्वीट केले आहे.

टीव्ही स्टार उर्फी जावेद अश्लील व विचित्र कपडे घालत असल्याच्या कारणावरून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच उर्फीवर राज्य महिला आयोगाने त्वरीत कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. मात्र आतापर्यंत तिच्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाहीये.

दरम्यान, चित्रा वाघ इतके प्रयत्न करूनही आपल्यावर कारवाई होत नाही, हे पाहता उर्फी जावेद चित्रा वाघ यांना डीवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. आज देखील तिने चित्रा वाघ यांना उद्देशून तीन ट्वीट केले आहे.  यामध्ये तिने आधी “चित्रा वाघ ने मुझे सुधार दिया” असे म्हंटले आहे तर दुसऱ्या ट्वीटमध्ये “सॉरी अभी हीसाब बाकी है” असे म्हंटले आहे. तर तिसऱ्या ट्वीटमध्ये “डीपी मेरी ढासू, चित्रा मेरी सासू”, असे म्हणत चित्रा वाघ यांना डिवचले आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी लवकरच उर्फीवर कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading