ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डाॅ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ माध्यमतज्ञ, संपादक,रंगकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे दीर्घकालीन आजाराने आज मुलुंड येथे निधन झाले. मेहेंदळे यांनी आपल्या भारदस्त आणि खणखणीत आवाजाच्या जोरावर आकाशवाणीवर दीर्घकाळ बातम्या देण्याचे कार्य केले. प्रथम ते दिल्ली केंद्रावर कार्यरत होते. पुढे मुंबई दूरदर्शन केंद्रावरूनही ते बातम्या देत असत. त्यांनी काही डॉक्युमेंटरीजना आपला आवाज दिला होता.
डाॅक्टर विश्वास मेहेंदळे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक निवेदक, नंतर वृत्तनिवेदक संपादक होते.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे माजी प्रमुख , ईएमआरसीचे संचालक,
सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संचालक होते. त्यांनी 30 हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्था अनेक नाटकांमधून अभिनय केला. व्यावसायिक रंगभूमीवरहि 7 नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग अभिनय केला.
‘लोकमान्य टिळक यांचे अग्रलेख ‘ या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठात डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी प्राप्त केली होती. त्यांनी ,इंदिरा गांधींपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत. अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असामींच्या मुलाखती घेतल्या आहेत . मला भेटलेली माणसे त्यांचा एकपात्री गाजलेला कार्यक्रम होता.
