Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

धायरी येथे डॉ.पंतगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा

पुणे: काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त निमित्त धायरी येथे खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात डॉ कदम यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण यांनी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चव्हाण पाटील म्हणाले, डॉ कदम यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. सिंहगड खडकवासला भागाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भारती सहकारी बँक, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ कदम यांनी या भागात लोकसंग्रह गोळा केला.
या वेळी पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, सादबा नाना पोकळे, राजाभाऊ कुंभर, लक्ष्मण दारवटकर , चेतन नलावडे, शंकर दोन्हे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading