Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गझल- गायनाने रंगली पुणेकर रसिकांची संध्याकाळ 

पुणे : सायंकाळचे आल्हाददायी वातावरण आणि हलक्याशा थंडीच्या साथीने सादर होणारे एकाहून एक सरस गझल आणि त्यानंतर सादर झालेले बहारदार गायन….शब्दसुरांनी रंगलेली एक संगीतमय संध्याकाळ रविवारी पुणेकरांनी अनुभविली.
व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित व बढेकर ग्रुप प्रस्तुत १४ व्या ‘स्वर झंकार’ या सांगीतिक महोत्सवाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी ज्येष्ठ गझल गायक पद्मश्री हरिहरन यांनी गझल सादर केली, तर गायक पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांचे गायन सादर झाले.
पहिल्या सत्रात हरिहरन यांनी गझल सादर केली. हाजिर २ या चित्रपटातील लोकप्रिय अशा ‘बेख्याली मे चलन उसका बताया उसको’ या केहेरवा तालातील गजलने त्यांनी आपल्या सादरीकरणास सुरूवात केली. त्यानंतर डॉ. बशीर बद्र यांची रचना असलेली  ‘ यू ही बेसबाब ना फिरा करो’ ही रूपक तालातील गझल, ‘ काश ऐसा कोई मंजर होता…’, लालिथा या दक्षिण भारतीय रागातील ‘दाइम पड़ा हुआ तिरे दर पर नहीं हूँ मैं…’ ही मिर्ज़ा ग़ालिब यांची गझल, ‘मरीज़ ए इश्क़ का क्या है जिया जिया ना जिया…’ ही हाजिर चित्रपटातील लोकप्रिय गजल सादर केली. यावेळी  जाझ संगीताच्या साथीने सादर केलेल्या ‘अक्स चेहरे पे…’ ही गुल्फाम अल्बममधील लोकप्रिय रचनेला रसिकांनी टाळ्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद दिला.  ‘अजीब सानेहा मुझपर गुजर गया यारो’ या गझल’ने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.
हरिहरन यांना अतुल राणींगा ( की बोर्ड ), संजय दास ( गिटार ), शादाब शकुरी ( तबला), अखलाख हुसैन ( हार्मोनियम)
त्यानंतर पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांचे गायन सादर झाले. त्यांनी राग बिहाग’ने आपल्या सादरीकरणास सुरूवात केली. त्यामध्ये ‘मेरो मन…’ ही विलंबित तीन ताल बंदिश, ‘ सजनवा आयो मोरे मंदिरवा… ही तीन तालातील बंदिश, ‘अब तो लाज…’ ही एक तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर  जोग रागात ज्हपतालमध्ये ‘ बात बनावत…’ ही बंदिश,  ‘साजन मोरे घर आये…’ ही तीन तालातील बंदिश सादर केली.
त्यांना अजय जोगळेकर ( संवादिनी ) ओजस अधिया ( तबला), मुराद अली खान ( सारंगी ), कृष्णा बोंगाणे, नागेश आडगावकर,अरमान खान ( तानपुरा व स्वरसाथ)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading