fbpx
Sunday, May 19, 2024
BusinessENTERTAINMENTLatest NewsNATIONAL

Shark Tank India Season 2 : ‘या’ सहभागी उद्योजकासाठी ‘शार्क’ रडवले

मुंबई : अनेक उद्योजक ज्या ‘शो’ची आतुरतेने वाट पाहत होते; तो ‘शार्क टँक इंडिया सीझन 2’ हा सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यात अनेक चांगले उद्योजक या शो मध्ये आपले नशीब आजामावण्यासाठी आले आहे. अनेकांना येथे फायनान्सर मिळत आहेत तर काही येथून निराश होवून परतत आहेत. मात्र, एक फुटवेअर उद्योजक आसा होता की त्यासाठी सर्व ‘शार्क’ भावूक झाले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

फ्लॅटहेड शूजचे सह-संस्थापक गणेश बालकृष्णन (बेंगलोर) हे त्यांचे नाव. हुशार लोकसुद्ध व्यावसायात ‘फेल’ होतात, हा एक नवीन धडा त्यांची कहाणी शिकवून गेली. आयआयटी _आयआयएम मधील शिक्षण, परदेशातील नोकरी अन् त्यानंतर उत्साहाने सुरू केलेला व्यावसाय डबगाईला आलेला असताना फायनान्सरच्या शोधात गणेश बालकृष्णन ‘शार्क टँक इंडिया सीझन 2’मध्ये आले होते. ते म्हणाले की, त्याची कंपनी, फ्लॅटहेड शूज, जर त्याला शोमधून पुरेसा निधी मिळाला नाही तर ती बंद होऊ शकतो. त्यांनी कबूल केले की ते गेल्या दोन महिन्यांपासून ते स्वतःचा निधी या कंपनीसाठी टाकत आहेत.

यावेळी शार्क विनीता सिंग म्हणाल्या की, तुम्ही थोडे भटकले आहात. तर इतर शार्कच म्हणण होत की ही कंपनी पुन्हा नव्याने सुरू करण्याची गरज आहे. हे ऐकताच गणेश बालकृष्णन हे भाऊक झाले. व म्हणाले, मग कोणतीही गुंतवणूक न मिळाल्यास मी नोकरी शोधेल आणि जेव्हा संसाधने मिळतील तेव्हा कंपनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल.  

गणेश बालकृष्णन शांत झाल्यावर अनुपम मित्तल यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली. तर अमन गुप्ता त्याला म्हणाले, “बिसानेस अपयशी असला तरी तू अपयशी नाहीस मित्रा” ‘शार्क’ त्याला भेटायला गेल्यावर, विनीताला रडू आवरले नाही. सगळेच भाऊक झाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading