Thursday, August 27, 2026
Latest NewsSports

21व्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेत बगिरा एफसी, ईगल एफसी, क्रिसेंट एफसी संघांची आगेकूच

पुणे : गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत बगिरा एफसी, क्रिसेंट एफसी, ईगल एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

सीओईपी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत बगिरा एफसी संघाने भाईजान एफसी संघाचा 6-2 असा पराभव करुन धुव्वा उडवला. सामन्यात दुसऱ्याच मिनिटालाआशिष मेहताने सँडी डिसूझाच्या पासवर ३० यार्डवरून अफलातून गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर  21व्या मिनिटाला बगिराच्या सुधीर जाधवने दिलेल्या पासवर संदीप देशपांडेने गोल करून हि आघाडी २-० ने वाढवली. 32व्या मिनिटाला सोनू मंडल ने गोल करून हि आघाडी आणखी वाढवली.  पिछाडीवर असलेल्या भाईजान एफसीच्या अमन यादवने दिलेल्या पासवर आहाद वाहिद याने 35 व्या मिनिटाला गोल करून हि आघाडी कमी केली. पूर्वार्धात बगिरा एफसी संघ ३-१ अशा फरकाने आघाडीवर होता.

उत्तरार्धातदेखील बगिरा एफसीच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. 47व्या मिनिटाला सोनू मंडलने आणखी एक, तर 52व्या मिनिटाला डॅनिएल फर्नांडिसने पेनल्टी केकवर गोल करून संघाला ५-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अखेर ५०व्या मिनिटाला भाईजान एफसीच्या मुजिर शेखने अफलातून चाल रचत गोल नोंदवून संघाला २-५ अशी स्थिती निर्माण करून दिली. पण बगिरा एफसीच्या खेळाडूंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.  55व्या मिनिटाला सुधीर जाधवने आशिष मेहताच्या पासवर गोल नोंदवून संघाला ६-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरपर्यंत बगिरा एफसी संघाने आपली आघाडी कायम ठेवत भाईजान एफसी संघाचा ६-२ अशा फरकाने पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात चुरशीच्या लढतीत क्रिसेंट एफसी संघाने डीएमआर एफसीचा ६-५ असा सडनडेथमध्ये पराभव केला. अन्य लढतीत ईगल एफसी संघाने सीएमएस फाल्कन्स संघाचा टायब्रेकरमध्ये ६-4 असा पराभव केला. विजयी संघाकडून अक्षय इंगळे, नितीन जारकर, उमेश पाडमुळे, प्रवीण भुजबळ, अमोल वागस्कर यांनी गोल केले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:

क्रिसेंट एफसी: 5(साई जोशी 10मि(पास-ओंकार सिंग), अभिजीत के, ओंकार सिंग, नील देशमुख, इरफान सय्यद)(गोल चुकविले-साई जोशी) टायब्रेकरमध्ये बरोबरी वि.डीएमआर एफसी: 5(रेहान सय्यद 55मि(पास-परविंदर सिंग), रेहान सय्यद, ब्रायन जोसेफ, अदनान शेख, आमिर कुरेशी)(गोल चुकविले-मुश्ता गीष); पूर्ण वेळ:-1-1; टायब्रेकर: 4-4;

क्रिसेंट एफसी: 1(तनिश शिंदे) सडनडेथमध्ये वि.वि.डीएमआर एफसी: ०;(गोल चुकविला:-परविंदर सिंग);

बगिरा एफसी: 6(आशिष मेहता 2मि.(पास-सँडी डिसूझा), संदीप देशपांडे 21मि.(पास-सुधीर जाधव), सोनू मंडल 32मि.(पास-सँडी डिसुझा), सोनू मंडल 47मि.(पास-नीरज दळवी), डॅनिएल फर्नांडिस 52मि.(पेनल्टी), सुधीर जाधव 55मि.(पास-आशिष मेहता))वि.वि.भाईजान एफसी:2(आहाद वाहिद 35मि.(पास-अमन यादव), मुजिर शेख 50मि.(पास-जाईद कुरेशी));

ईगल एफसी: 6(नितीन जारकर 23मि.(पास-उमेश पाडमुळे), अक्षय इंगळे, नितीन जारकर, उमेश पाडमुळे, प्रवीण भुजबळ, अमोल वागस्कर)टायब्रेकरमध्ये वि.वि.सीएमएस फाल्कन्स: 4(यशवंत धनवडे 3मि.(पास-राजीव राज), क्लिफर्ड डिसुझा, सिद्धार्थ झपके, अभिषेक त्रिपाठी)(गोल चुकविला-रोहन मेनन); पूर्ण वेळ: 1-1; टायब्रेकरमध्ये वि.वि.5-3.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading