Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

कशेडी  : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश  कदम यांच्या गाडीला शुक्रवरी रात्री सव्वादहा च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

जखमी चालकावर चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.रूग्णालयात आमदार योगेश कदम  जातीने उपस्थित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणा-या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली .यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करित आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading