सानंद वर्मा म्हणतो, ‘‘वास्तविक जीवनात मी सक्सेनासारखाच वेडा माणूस आहे’’
टेलिव्हिजन, ओटीटी व चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सानंद वर्मा एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील त्याची विनोदी व अनोखी भूमिका अनोखेलाल सक्सेनामुळे अत्यंत लोकप्रिय बनला आहे. अभिनेता मालिकेमध्ये सात वर्षांपासून आपल्या अद्वितीच विनोदीशैलीसह प्रेक्षकंना हसवून-हसवून लोटपोट करत आहे. मुलाखतीदरम्यान सानंदने मनोरंजन क्षेत्रातील त्याचा प्रवास, त्याची विद्यमान मालिका, स्वप्नवत भूमिका आणि आगामी प्रकल्पांबाबत सांगितले.
१. तुझ्या अभिनय करिअरची सुरूवात कशाप्रकारे झाली आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करणे सोपे होते का?
मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत होतो आणि आरामदायी जीवन जगत होतो. पण माझी नेहमीच अभिनय साकारण्याची इच्छा होती. म्हणून मी नोकरी सोडली आणि अभिनेता म्हणून करिअर घडवण्याचे ठरवले. हा प्रवास खूप खडतर होता, पण मी हार मानली नाही. मला आठवते की, मुंबईमध्ये आल्यानंतर माझ्याकडे राहायला जागा नव्हती. माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मी केमिस्ट दुकानाच्या दुर्गंधीयुक्त गोडाऊनमध्ये झोपायचो. मी ऑडिशन्स देण्यासाठी अनेक मैल पायी चालत जायचो. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर मी माझा सर्व पैसा घरामध्ये गुंतवला, तसेच कार परवडत नसल्यामुळे विकली. दररोज प्रवासासाठी कॅब किंवा रिक्षा करणे देखील अशक्य होते. जाहिरातीसह माझ्या अभिनय करिअरची सुरूवात झाली आणि अनेकांना माहित नाही की, मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये काम करण्यापूर्वी मी २० हून अधिक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसलो आहे. माझे दिग्दर्शक शशांक बाली जी यांच्या मदतीने मला मालिका ‘भाबीजी घर पर हे’मध्ये अनोखेलाल सक्सेनाची भूमिका मिळाली, ज्यामुळे मी स्वत:ला खूप नशीबवान मानतो. शशांक बाली जी यांनी मला ही संधी दिली आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही.
२. व्यावसायिकदृष्ट्या अभिनय साकारण्याच्या निर्णयाप्रती तुझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?
माझ्या कुटुंबाने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. माझ्यावर मोठी आर्थिक जबाबदारी असताना देखील माझ्या आईवडिलांनी मी नोकरी सोडून अभिनेता म्हणून करिअर घडवण्याच्या माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. मी माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या माझ्या आईचे, तसेच या क्षेत्रामध्ये येण्यास साह्य केलेल्या काही अद्भुत व सहाय्यक लोकांचे देखील आभार मानतो.
३. तुझी भूमिका अनोखेलाल सक्सेना घराघरामध्ये लोकप्रिय आहे, मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अशी अपेक्षा होती का?
अनोखेलाल सक्सेना ही मी सतत साकारलेली पहिली भूमिका आहे आणि मागील सात वर्षांमध्ये जवळपास १९०० एपिसोड्समध्ये दिसलो आहे. मी कलाकार म्हणून मिळालेले प्रेम व पाठिंब्यासाठी कृतज्ञ आहे. यामधून कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे मोठे समाधान मिळते. लहान मुले माझ्या भूमिकेवर प्रेमाचा वर्षाव करतात ‘आय लाइक इट’ म्हणत माझे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. भूमिकेप्रती त्यांच्या सतत प्रशंसेने मला मालिकेमध्ये सर्वोत्तम अभिनय सादर करण्यास आणि क्षेत्रामध्ये माझी अद्वितीय ओळख निर्माण करण्यास स्फूर्ती दिली.
४. तुला तुझ्या भूमिकेबाबत सर्वाधिक कोणती बाब आवडते?
अनोखेलाल सक्सेना अत्यंत असामान्य, आव्हानात्मक आणि वास्तविक जीवनात माझ्या व्यक्तिमत्त्वासारखाच आहे. भावना न दुखावता विनोद सादर करणे हे कोणत्याही कलाकरासाठी आव्हानात्मक असते. मी वास्तविक जीवनात देखील सक्सेना सारखा वेडा माणूस आहे आणि माझ्या मते, याच बाबीमुळे मी या विलक्षण व असामान्य भूमिकेला न्याय देऊ शकतो
५. अभिनेता असण्याव्यतिरिक्त तुझी चाहत्यांचे कशाप्रकारे मनोरंजन करण्याची इच्छा आहे?
मला गायला आवडते. दररोज सकाळी मी रियाजसाठी ५ वाजता उठतो. पण माझ्या व्यस्त शूटिंग वेळापत्रकामुळे मला काही काळ तसे करू शकलो नाही. पण शूटिंगदरम्यान वेळ मिळाल्यास मी गायनाचा सराव करतो. कधीतरी प्रोफेशनल गायक म्हणून परफॉर्म करण्याची आणि माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची माझी इच्छा आहे.
६. तुझे आगामी प्रकल्प कोणते आहेत?
मी दोन ते तीन वेब सिरीजमध्ये काम करत आहे, ज्या लवकरच प्रदर्शित होणार आहेत आणि अक्षय कुमार व परिणीती चोप्रा अभिनीत चित्रपट ‘कॅप्सूल गिल’मध्ये काम करत आहे. तर मग धमाकेदार मनोरंजनासाठी सज्ज राहा.
७. या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना तुझा काय सल्ला आहे?
आत्मविश्वास असण्यासोबत आपल्या कौशल्यांवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. तसेच वय, देहबोली किंवा लिंग यांव्यतिरिक्त अभिनय साकारण्याचा निर्धार देखील असला पाहिजे. नेहमी आपल्या स्वप्नांना साकारण्याचा प्रयत्न करा आणि खचून जाऊ नका. माझ्या मते, अभिनय म्हणून करिअर घडवण्यासाठी आताच ही उत्तम वेळ आहे. कारण तुमचे कौशल्य दाखवण्यसाठी चित्रपटसृष्टी, जीईसी चॅनेल्स, यूट्यूब व ओटीटी अशी अनेक व्यासपीठे आहेत.
