Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

अरे हे काय चाललयं; हिला तात्काळ अटक करा – चित्रा वाघ

मुंबई : अती बोल्ड आणि विचित्र पेहरावामुळे नेहमी चर्चेत असलेली उर्फी जावेद आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे. तिच्या विचित्र ड्रेसिंग सेंसमुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे.

एकीकडे निष्पाप महिला व मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हिला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’मधून उर्फी प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक होती. पण शोमधून बाहेर आल्यानंतर बोल्ड फॅशन सेन्समुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. इतकेच नव्हे तर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading