Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

स्मशानभूमीत जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथींना अटक

पुणे : शहरातील  वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोना सारखे अघोरी कृती करताना आढळून आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथींना अटक केली असून लक्ष्मी निबाजी शिंदे ( मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (कोथरूड पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैकुंठ स्मशानभूमीत रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही वेळात लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळ हे चितेजवळ आले. दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सुया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती करीत होते. ही घटना स्मशानभूमीमधील एक कर्मचाऱ्याने पहिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी आणि इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading