fbpx

भाजपचे आमदार जयकुमार गोरे अपघातात गंभीर जखमी, रुबी रुग्णालयात दाखल

पुणे:भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि माण खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे भीषण अपघात झाला असून अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्या सोबत असलेले इतर तिघेही जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे नागपूर अधिवेशनाहून पुणे येथे आले होते. तेथून फलटण मार्गे शनिवारी पहाटे तीन वाजता त्यांच्या गावी जात असताना फलटण शहरांमध्ये असणाऱ्या स्मशानभूमी जवळील बाणगंगा नदीच्या पुलावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने गाडी पलटी होऊन नदीत पडली.
आमदार जयकुमार गोरेंसह त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि चालक असे चौघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत मोबाईल वरुन माहिती देताच पोलिस आणि कार्यकर्ते अपघातस्थळी आले. आमदार गोरे यांना पुणे येथे तर इतरांना बारामती येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नदीत पडलेली गाडी क्रेनच्या साह्याने वर काढण्यात आली आहे. गाडीचा पूर्णपणे चूराडा झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: