fbpx

परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा करिश्मा !

परळी वैजनाथ: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा करिश्मा सोसायट्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. मतदारसंघातील सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूर सह सुमारे ६० टक्के ग्रामपंचायतीवर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेली कौठळीची ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. परळी तालुक्यातील ७६ आणि मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. परळी तालुक्यातील लिंबुटा, मांडेखेल, माळहिवरा/ गोपाळपूर आणि तळेगाव या ग्रा.पं. यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीनंतर लागेलेले निकाल लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांचाच करिश्मा मतदारसंघावर असल्याचे सिध्द झाले. परळी मतदारसंघातील सुमारे ७७ ग्रामपंचायतीवर भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे.

भारतीय जनता पक्षाशी दगाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवला. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली कौठळी येथील निवडणुक भाजपने जिंकली. याठिकाणी अनिता काटे या सरपंचपदी निवडून आल्या तर आचार्य टाकळी येथे सीमा घोडके या सरपंच झाल्या. या दोघांचे पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.

सिरसाळा, नागापूर, दादाहरी वडगाव, घाटनांदुर, बर्दापूर, गाढे पिंपळगाव, कन्हेरवाडी, पिंपळा धायगुडा, सायगाव, जवळगाव, पुस आदींसह अनेक मोठया ग्रामपंचायती पंकजाताई मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा रोष मतदारांनी या निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त केला.

यशःश्री निवासस्थान सकाळपासूनच भाजपचे कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांनी गजबजून गेले होते. पंकजाताई आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.गुलाल उधळून सर्वांनी एकच जल्लोष केला. पंकजाताईंनी स्वतःच्या हाताने विजयी उमेदवारांना पेढे देऊन अभिनंदन केले. हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, विजयाची घोडदौड आगामी विधानसभेतही अशीच चालू ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: