fbpx

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची पत्रकार क्लबला भेट

नागपूर :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथील पत्रकार क्लबला भेट देऊन शहरातील वरिष्ठ संपादक आणि पत्रकार बांधवांसोबत विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह राज्यासमोरील विविध मुद्यांवर अनौपचारिक संवाद साधला. माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील त्यांच्यासोबत होते. अजित पवार यांच्यासोबतच्या संवादावेळी पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, जोसेफ राव, ब्रम्ह त्रिपाठी, श्रीपाद अपराजीत, शैलेश पांडे, गजानन निमदेव, संदीप भारंबे, रमेश कुलकर्णी, राजेश्वर मिश्रा, गजानन जानभोर, श्रीमंत माने, राजा माने आदी वरिष्ठ संपादक, पत्रकार उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

%d bloggers like this: