पृथ्वीराज दुधाणे, नीरज जोरवेकर, रिआन मुजगूळे, जोशुआ डिक्रुझ, आर्यन किर्तने, धीरज मनमोडे यांची विजयी आगेकूच!!
पुणे : रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सोलारीस करंडक’ अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१४ वर्षाखालील) स्पर्धेत पृथ्वीराज दुधाणे, नीरज जोरवेकर, रिआन मुजगूळे, जोशुआ डिक्रुझ, आर्यन किर्तने आणि धीरज मनमोडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता तिसर्या फेरीत पृथ्वीराज दुधाणे याने सय्यम पाटील याचा ९-७ असा संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात नीरज जोरवेकर याने अरीश वडनेरकर याचा ९-६ असा पराभव केला. रिआन मुजगूळे याने आदित्य योगू याचा ९-६ असा पराभव केला.
जोशुआ डिक्रुझ याने राघव अगरवाल याचा तर, आर्यन किर्तने याने सर्वज्ञ सरोदे याचा ९-४ अशा सारख्याच फरकाने पराभव केला. नमिश हुड याने रोहन बोरडे याचा ९-२ असा पराभव केला. अश्ररीत माजी याने रणवीर गुंड याचा ९-१ असा पराभव करून आगेकूच केली. धीरज मनमोडे याने आदि बारडे याचा ९-३ असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा संक्षिप्त निकालः पात्रता फेरीः तिसरी फेरीः
जोशुआ डिक्रुझ वि.वि. राघव अगरवाल ९-४; नीरज जोरवेकर वि.वि. अरीश वडनेरकर ९-६;
रिआन मुजगूळे वि.वि. आदित्य योगू ९-६; आर्यन किर्तने वि.वि. सर्वज्ञ सरोदे ९-४;
नमिश हुड वि.वि. रोहन बोरडे ९-२; अश्ररीत माजी वि.वि. रणवीर गुंड ९-१;
धीरज मनमोडे वि.वि. आदि बारडे ९-३; पृथ्वीराज दुधाणे वि.वि. सय्यम पाटील ९-७.
