fbpx

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणी ची 19 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत बैठक 

मुंबई  – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक येत्या  सोमवार दि.19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नविदिल्ली येथील कॉन्स्टिट्युशनल क्लब येथे अयोजित करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या महत्वपूर्ण बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी आणि प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

नवीदिल्लीत दि.19 डिसेंबर 2022 रोजी होत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणी च्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले मार्गदर्शन करणार असून त्यांच्या नेतृत्वात  रिपब्लिकन पक्षाची 25 सदस्यांची रिपब्लिकन कार्यकारी समिती (आर डब्ल्यू सी )  निवडण्यात येणार आहे. नविदिल्लीत कॉन्स्टिट्युशनल क्लब च्या सभागृहात आयोजित केलेल्या  रिपाइंच्या या  राष्ट्रीय कार्यकरिणी च्या  महत्वपूर्ण बैठकीला देशभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: