fbpx

अर्जुन अप्पीला करणार अनोख्या पद्धतीने प्रपोझ

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. येत्या १६ आणि १७ डिसेंबरला आपण पाहणार आहोत की अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जाणार आहे. पॅराग्लायडिंग करत अर्जुन अप्पीला प्रपोझ करणार आहे. ह्या विशेष भागाचं शूट पाचगणी भागात नुकतंच झालं. या पॅराग्लायडिंग शूटिंग दरम्यान अप्पी आणि अर्जुन खूप उत्साहित होते कारण त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा त्यांच्यासाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव होता, अप्पी आमची कॉलेक्टर मालिकेची पूर्ण टीमच ह्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान उत्साहित होती. मालिकेतील हा भाग अतिशय खास आणि महत्वाच्या भागांपैकी एक असणार आहे. ह्या विशेष  भागाचे फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत.

 

तेव्हा पाहायला विसरू नका “अप्पी आमची कलेक्टर” सोमवार ते शनिवार संध्या ७ वाजता  फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: