fbpx

भीमा कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आढावा घेतला आणि विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, सा. बां.विद्युत विभाग आदी विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला.

देशभरातील अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: