Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

वंचित बहुजन आघाडी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

पुणे:वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आदरणीय व स्वाभिमानी नेतृत्व अँड प्रकाश तथा #बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य सदस्य मा.ऋषिकेश नागरे पाटील यांच्या हस्ते व पुणे शहर महासचिव महेश कांबळे, जितेन्द्र जाधव पुणे शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे आणि वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विवेक कृष्णा लोंढे , हडपसर विधानसभा अध्यक्ष बाळू हजारे यांच्या प्रमूख उपस्थित मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर उपाध्यक्ष शुभम चव्हाण यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यटवयचा राजीनामा देत दिनाक १२ डिसेंबर २०२२ रोजी पक्ष वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
सद्य स्थिती मध्ये बहुजन महापुरुषांनवर भारतीय जनता पार्टी च्या नेत्यां कडून सातत्याने टीका होत आहे.त्या मुळे हा निर्णय घेत आहे असे शुभम चव्हाण यांनी सांगितले.
त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना संघटक श्रीराम गायकवाड सह संघटक प्रकाश कांबळे, सह सचिव सौरभ कांबळे प्रभाग क्रमांक ९ येरवडा अध्यक्ष राज युवराज ओव्हाळ संघटक संतोष झेंडे, अमोल भोसले व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading