Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पूना कॉलेजला नॅक मूल्यांकनात  ए प्लस श्रेणी

अंजुमन खैरुल इस्लाम संस्था मुम्बई द्वारा संचालित कॅम्पमधील पूना कॉलेज 
पुणे : कॅम्प मधील पूना कॉलेज ऑफ़ आर्ट्स सायन्स व कॉमर्स पुणे यांना राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषदेतर्फे नॅक ए प्लस श्रेणी (३. २७ गुण)  मिळाली आहे. देश पातऴीवर उच्च शिक्षण देणा־या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदतर्फे महाविद्यालयाची गुणवत्ता तपासली जाते.  समिती चेयरपर्सन प्रो. डॉ. मधुमिता दास (ओड़ीसा), समिती समन्वयक डॉ. विजय देव सिंह (जम्मू) व समिती सदस्य डॉ. पाचा मलयादरी (तेलंगाना) या नॅकच्या तज्ञ समितीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले होते.
तृतीय सायकलमध्ये ए प्लस श्रेणी प्राप्त करणारे पुणे शहरातील अंजुमन खैरुल इस्लाम संस्था मुम्बई द्वारा संचलित पूना कॉलेज हे नामांकित महाविद्यालय आहे. कॉलेजचे प्राचार्य आफताब अन्वर शेख यांनी या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले.
अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष निसार पटेल, सरचिटणीस हानी अहमद फरीद, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व विश्वस्त डॉ. हनीफ लकडावाला, मेहबूब पटेल, इरफान फर्निचरवाला, मन्सूर मेहता, इम्तियाज अटलासवाला आणि उबेद हकीम यांनी  ‘ए+’ श्रेणी मिळाल्याबद्दल  प्राचार्य प्रोफेसर डॉ. आफताब अनवर शेख, आईक्यूएसी वाइस चेयरमन डॉ. इकबाल शेख, उपप्राचार्य मोईनुद्दीन खान, आईक्यूएसी समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख, अध्यापक वर्ग तसेच कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading