Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

अंतरंगातील परमात्मा शोधण्याचा प्रयत्न करा – प्रणव गोखले यांचे मत

    पुणे : ज्याच्यापोटी अनंत ब्रम्हांड सामावलेला आहे, तो परमात्मा आपल्या अंतरी आहे. तो परमात्मा माझ्यात आहे, हा प्रत्यय जेव्हा येतो. तेव्हा ना देऊळ राहत ना परमेश्वर राहात. परमेश्वर आणि भक्त यातील व्दैत संपते आणि त्याच्या मुळाशी आपणच दिसतो. आत्म्याचे केंद्र आपण बाहेर शोधत आहोत, परंतु तो आपल्या अंतरंगात आहे. तो शोधण्यासाठी बाबाजी आपल्याला मदत करतात, असे मत वैदिक संशोधन मंडळाचे साहाय्यक संचालक प्रणव गोखले यांनी व्यक्त केले.

    श्री महावतार बाबाजी प्रेमोत्सव २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी बाबाजी, क्रियायोग व गुरुतत्व यावर आणि डॉ.मनाली केतकर यांनी महावतार बाबाजी – दत्तयोगावतार याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रेमोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून यामध्ये मंत्रघोष, भजन, ओंकार, तसेच प्रख्यात गायक अजित कडकडे यांच्या भजनांचे सादरीकरण झाले.

    यावेळी हैद्राबाद येथील आनंदघन लिखित ‘बाबाजीज् स्टोरीज’ या तृप्ती कुलकर्णी यांनी मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संध्या भाटे, हेमंत जाधव, जयंत खेडकर, प्रशांत पवार, बाळासाहेब हनवते, प्रसाद मुळे आदींनी केले.

    डॉ. मनाली केतकरम्हणाल्या, दत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यातीन अवतारांची सर्वांना माहिती आहे. परंतु पूर्व युगातील दत्ताचे सोळा अवतार अनेकांना माहिती नाही. या सोळा अवतरांची माहिती व श्री महावतार बाबाजी यांच्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading