fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

संभाजी ब्रिगेडचे प्रशिक्षित कार्यकर्ते भविष्यात जातीयवाद्यांच्या मुसक्या आवळतील – गंगाधर बनबरे

पुणे : महाराष्ट्राला प्रशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे. लोकांकडे कार्यकर्त्यांची संख्या भरपूर असून त्यांचा फक्त गर्दी जमवण्यासाठी वापर होतो. वैचारिक तरुणांची फळी कुठल्याही पक्ष संघटनेकडे नाही. कुठल्याही पक्ष संघटनेला विचारधारा नाही. संभाजी ब्रिगेड कडेच कॅडर बेस प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी असून महाराष्ट्र सह देशात फोफावलेला जातीवाद, मनुवाद गाडायचा असेल तर संभाजी ब्रिगेडचे प्रशिक्षित कार्यकर्तेच भविष्यात जातीयवाद यांच्या मुस्क्या आवळतील. मात्र त्यासाठी संघटन बांधणी मजबूत करावी असे मत संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी पुण्यात व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड पर्वती मतदार संघाच्या वतीने कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर बागुल उद्यान येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात आयोजित केले होते.

महाराष्ट्रात जातीयवादी शिवद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही लोकांची संख्या वाढली आहे. कोशारी असो की त्रिवेदी, लोढा असो की प्रसाद लाड शिवरायांचा अपमान करण्यात ही माणसं दंग आहेत. अशा लोकांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे जगाला माहिती आहे. भाजप आणि आरएसएस (RSS) ची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये करिअर म्हणून काम करावे कार्यकर्त्यांना भरपूर संधी उपलब्ध आहे मात्र प्रामाणिकपणे संघटनात्मक बांधणी करून लोकहितासाठी पुढे होऊन काम करण्याची गरज आहे… असे मत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने पर्वती मतदार संघात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिरे होणार आहेत याची सुरुवात पर्वती मतदारसंघातून झाली. याचे नियोजन पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष पैलवान कुमार पवार सर यांनी केले होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल परदेशी, व्यंकटेश मानपिडी, आनंद सुर्वे, पै. रजनीकांत चोरगे, जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, तेजश्री पवार, कुमार गायकवाड पंढरीनाथ सोंडकर विठ्ठल सूर्यवंशी, विवेक तुपे, अजय पवार, सुरेखा जजगर, महादेव मातेरे व पर्वती मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कुमार पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading