Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

विशेष मतदार नोंदणी शिबिरात ६५४ दिव्यांग मतदारांची नोंदणी

पुणे :  जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचेमार्फत आयोजित विशेष शिबीरात एकूण ६५४ पात्र दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात आली.

छायाचिच मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपंथीय,देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया दिव्यांग, भटक्या व विमुक्त जमाती अशा वंचित घटकांना लक्षित करून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये त्यांना निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी विविध विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

दिव्यांगांची मतदार नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात करण्यासाठी व त्यांना या संधीचा लाभ घेता यावा म्हणून दिव्यांगासाठी कामकाज करणाऱ्या विविध संस्थेच्या सहकार्याने मतदार नोंदणीसाठी ८ डिसेंबर पर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना http://www.nvsp.in voterportal.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून व voter helpline app या मोबाईल अॅपचा वापर करून नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज क्र.६ व ज्या दिव्यांग मतदारांचे नाव मतदार यादीत चिन्हांकित झाले नसेल त्यांनी अर्ज क्र. ८ भरून मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल.

दिव्यांगांनी या संधीचा लाभ घेत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत त्यांचा बहुमोल सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading