Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील नृत्यांगनांच्या वतीने गुरु शमा भाटे यांचा जाहीर सत्कार

पुणे  : कथक गुरू शमा भाटे यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला याचेच औचित्य साधत पुण्यातील कथक, भरतनाट्यम नृत्यांगना एकत्र येत त्यांचा जाहीर सत्कार करणार आहेत. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने येत्या मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी सायं ६ वाजता कोथरूड येथील एम ई एस बालशिक्षण सभागृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल.

पुण्यातीलच कथक गुरू डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना देखील या वेळी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचाही सत्कार या कार्यक्रमा दरम्यान करण्यात येईल. भरतनाट्यम गुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल.

शास्त्रीय नृत्य संवर्धन ही पुण्यातील नृत्यगुरू व विद्यार्थ्यांची संस्था असून शास्त्रीय संगीताच्या प्रसार व प्रचारासाठी कार्यरत आहे. तसेच गुरु शमा भाटे या जेष्ठ कथक नृत्य गुरु असून त्या त्यांच्या विविधरंगी नृत्यरचनांसाठी प्रसिद्ध आहेत. शमाताई नाद-रूप या संस्थेच्या संस्थापिका व कलात्मक प्रमुख असून,  भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यांचे शिष्य नृत्य प्रचार व प्रसाराचे काम करतात. तर डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे देखील कथक नृत्य गुरु असून पं. बिरजू महाराज यांचे ते ज्येष्ठ शिष्य आहेत. शिवाय नंदकिशोर कल्चरल सोसायटी या संथेचे ते संचालक देखील आहेत.

सत्कारानंतर कार्यक्रमाचा शेवट नादरूपच्या विद्यार्थिनींच्या नृत्य प्रस्तुतीने होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading