राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध
पुणे:अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून सात ते आठ दिवसच झाले असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावलेले असताना राज्यपालांना भाजप मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुण्यात दौऱ्यावर पाठवतय की काय असा प्रश्न शिवप्रेमींना पडतो.
वाचाळहीन राज्यपाल आज पुण्यातील राजभवनात आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून “राज्यपाल चले जाओ” अशा निषेधार्थ घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उमेश पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, पुणे शहरअध्यक्ष राहुल शिरसाठ व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
