Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

Loyala Inter School Football – सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलचा विजय

पुणे : सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलने लॉयला स्कूल आणि लॉयला स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित लॉयला कप फुटबॉल स्पर्धेत विजय नोंदवले. पाषाणमधील लॉयला स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

सोळा वर्षांखालील गटात सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलने कलमाडी स्कूलचा ८-१ ने पराभव केला. यात सेंट अरनॉल्ड स्कूलकडून अयान कोतवालने चार (२, ११, २०, ३७ मि.), तर अश्मित कोन्नतने दोन (४२, ५६ मि.) गोल नोंदवले. तसेच, एथन लोपेस, जोहान विनोद यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. कलमाडी स्कूलच्या तनिष अयचित्तेने एकमेव गोल नोंदवला.

चौदा वर्षांखालील मुलांच्या गटातही सेंट अरनॉल्ड स्कूलने कलमाडी स्कूलचाच ४-१ असा पराभव केला. यात अर्शान सिद्दीबिलालने हॅट्‌‌ट्रिक नोंदवली, तर संजित डायसने एक गोल नोंदवला. कलमाडी स्कूलकडून रुद्र नलावडेने एकमेव गोल नोंदवला.

निकाल :

१६ वर्षांखालील गट : सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल – ८ (अयान कोतवाल, २, ११, २०, ३७ मि.; अश्मित कोन्नत ४२, ५६ मि., एथन लोपेस ५३ मि.; जोहान विनोद ५५ मि.) वि. वि. डॉ. कलमाडी श्यामराव स्कूल – १ (तनिष अयचित्ते ५० मि.).

१४ वर्षांखालील गट : सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल – ४ (अर्शान सिद्दीबिलाल ९, २७, ३३ मि.; संजित डायस ३५ मि.) वि. वि. डॉ. कलमाडी श्यामराव स्कूल – १ (रुद्र नलावडे ५५ मि.)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading