Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

जर्मनीच्या राजदूतांची फर्ग्युसनला भेट

पुणे : जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकेरमन आणि महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी डीईएसच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट दिली.

भारत आणि जर्मनी यांच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य दृढ होण्याची आवश्यकता असल्याचे मत अकेरमन यांनी व्यक्त केले.

फॅबिग म्हणाले, ‘अभिजात भाषा, वाङ्मय आणि विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांचे खुलेपणाने स्वागत करण्यास जर्मनीतील विद्यापीठे उत्सुक आहेत.’

प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रबंधक डॉ. सविता केळकर, जर्मन विभाग प्रमुख अमृता कुलकर्णी, प्रा. ज्योत्स्ना वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading