पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना अनोखी मानवंदना
सारसबागेत चित्रकलेतून ११ हजार चिमुकल्यांनी वाहिली आदरांजली
पुणे : जो शहीद हुए है उनकी, जरा यॉंद करो कुर्बानी… या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही मोठया संख्येने सारसबागेत जमले. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना देत त्यांच्या हौताम्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांनी दिलेली मानवंदना अनुभवताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. पोलिसांसह ११ हजार शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना चित्ररुपी श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, रामनाथ पोकळे, स्मार्तना पाटील, संदीपसिंह गिल, विक्रांत देशमुख, श्रीनिवास घाडगे, आर. राजा, सुषमा चव्हाण, आर.एन.राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, श्रीहरि बहिरट, सोमनाथ जाधव, संगीता यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, शिरीष मोहिते, अॅड. सुभाष मोहिते अध्यक्ष पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, राजाभाऊ कदम, प्रताप निकम, डॉ. मिलिंद भोई , सूर्यकांत पाठक, अॅड. शिरीष शिंदे, बाळासाहेब अमराळे यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले.
स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी संविधान वाचन केले. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यां
साठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. सर्वाधिक मुलांच्या सहभागाबद्दल श्री विजय वल्लभ शाळेचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीष चरवड, संदीप गायकवाड, गोपाळ परदेशी, नितीन होले, शेखर देडगावकर, मनोहर जाधव, प्रा. सागर पानसरे, विनोद क्षीरसागर, कृत्रिका मोहिते यांनी केले. मंडळाचे तन्मय तोडमल, अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, अॅड. हेमंत झंजाड, सागर पवार, जगदीश शेटे, अजय पंडित, लाला परदेशी यांनी संयोजनात सहभाग घेतला. पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांसाठी खाऊची व्यवस्था करण्यात आली होती.