Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

MPSC : २ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२चे प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त चाळणी परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या  https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव, (दक्षता, धोरण व संशोधन ) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact – secretary@mpsc.gov.in  व  support-online@mpsc.gov.in या ईमेलवर अथवा १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Computer Based Examinations>Mock Test’ येथे एक वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर मॉकटेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading