Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

नवले पूल अपघात प्रकरणी ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे: नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून त्याला चाकण येथील नानेकरवाडी येथून ताब्यात घेतले आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील (एपी 02 टीई 5858) चालकाचे नियंत्रण सुटले आणि 48 गाड्यांना उडवत तो कंटेनर वाडगाव पुलाजवळ जाऊन आदळला होता. यानंतर तो चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले होते. तर, प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले होते. मात्र, तपासाअंती चालकाने उतारावरुन गाडी बंद केल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे. चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading