Friday, August 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नवले पूल, पुणेकरांची चिंता आणि गडकरींची हवेतील बस!

पुणे: नवले पूल जिथे अपघात झाला तिथे आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, खडकवासला अध्यक्ष श्रीकांत चांदणे, जिल्हा संघटन सचिव अक्षय शिंदे, साहिल जवळेकर, खडकवासला उपाध्यक्ष राजलक्ष्मी शिंदे इत्यादींनी भेट देऊन पाहणी केली. त्या संदर्भात काही महत्त्वाची बाबी आणि त्याबाबतच्या सूचना आम आदमी पार्टी तर्फे नॅशनल हायवे अथोरिटी ला कळवणार आहोत.

मुख्यत्वे आज पुणेकराला जीवाची भीती म्हणजे सकाळी दिलेला नवरा किंवा मुलगा सुखरूप रात्री परत येईल का याची काळजी कुटुंबीयांना वाटत राहते. आज पुण्यात ही परिस्थिती उद्भवली आहे. याला जबाबदार जिथे स्थानिक नगरपालिका त्याच बरोबर हायवे अथोरिटी अधिकारी आणि आपले मंत्री गडकरी साहेब हे जबाबदार आहेत. गडकरी साहेबांना गेले वर्षभर या रस्त्याबाबत अनेकजण विविध निवेदन देत आहे त्यावर तिथे आश्वासन देत आहेत परंतु त्याबाबत कोणती कार्यवाही अजूनही झालेले नाही. माञ हवेतील बसची स्वप्ने दाखवत असतात.

*आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे हायवे इंजिनिअरिंग चे जे मार्गदर्शक नियम आहेत, सूचना आहेत त्यानुसार ब्रेकिंगचा स्पीड ड्रायव्हरचा, प्रतिसाद ,गाडीचा वेग, पाणी पाऊस तसेच ब्रेक दाबल्यावर गाडी पुढे जाणार त्याचे अंतर या सर्व बाबी लक्षात घेऊन *’रोड साईड क्लिअर झोन’* म्हणजेच डाव्या बाजूला लेनच्या समांतर येत ब्रेक फेल झाल्यानंतर गाडी घुसवण्यासाठी मोकळी जागा , रस्ता असतो. नवले पुलापाशी मात्र जर ड्रायव्हरला लक्षात आले त्याचा ब्रेक फेल झाला आहे तर त्याला समोरच्याला धडक देणे अथवा साईडच्या सर्विस रोड मध्ये गाडी घुसून लोकांना मारणे याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच सर्व अवजड वाहने केवळ डाव्या बाजूने चालवली जातील याची काळजी घेणे तसेच डावीकडचे रोड पंचर आणि अतिक्रमण काढणे इतर सर्व बाबी तातडीने करायला हव्यात अन्यथा 65 मृत्यू झाल्यावर सुद्धा सरकार जागे होत नाही असे म्हणावे लागेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading