Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

महापालिका शाळे च्या विद्यार्थ्यांना स्वेटर द्यावेत -संगीता तिवारी

पुणे: आयुक्त साहेब  पुण्यामध्ये प्रचंड थंडी वाढली आहे. आपल्या महापालिका शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा गरीब घरातून येतो तेव्हा ज्यांच्याकडे स्वेटर नाहीयेत किंवा ज्यांना दिले गेले नाहीयेत  ते विद्यार्थी हे थंडीत कुडकुडत शाळेत येत आहेत.  त्यामुळे आपल्या मनपा शाळेच्या गरीब विद्यार्थांसाठी स्वेटर अतिशय गरजे चे आहेत. खरे तर आपण म्हणजे शिक्षण मंडळ ने हे सर्व काम थंडी च्या आधी १/२ महिने केले पाहिजे होते. सर्व विद्यार्थ्याना स्वेटर हे मिळालेच पाहिजेत. अशी मागणी शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांनी केली आहे.

शिक्षणप्रमुख आणि राउत  यांची ही जबाबदारी होती की आपले विद्यार्थी थंडी त कुडकुड तील. आपण त्यांना ह्याचा जाब विचारणे गरजेचे आहे. आज पैसे वाले लोक स्वेटर विकत घेवु शकतात पण घरकाम , मोलमजुरी करणारे नाही घेवू शकत कारण त्यांचे पगार तेवढे नसतात. आपल्या महापालिका आणि शिक्षण मंडळ यांच्या नवीन धोरणाप्रमाणे दरवर्षी स्वेटर न देता एका वर्षा आड आपण स्वेटर द्यायचे असे धोरण केले आहे परंतु दोन वर्ष करोना काळामध्ये विद्यार्थ्यांना कोणतेही शालेय शिक्षण साहित्य अथवा स्वेटर असे काही दिले गेले नाहीये. आयुक्त साहेब कृपया आपण या गोष्टीवर विचार करावा.
आपले गरीब विद्यार्थी यांची जबाबदारी पूर्णतः शिक्षण मंडळ आणि पुणे मनपा यांचेवर आहे.

माननीय आयुक्त साहेब आपण सर्व मुलांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा केले नाहीयेत. तेव्हा दुसरी, साहवी, आणि आठवी ह्या मुलांच्या अकाउंटला ताबडतोब पैसे टाकावे. यासाठी ताबडतोब आपल्या सुरक्षा ठेवी मोडून या मुलांना स्वेटर साठी पैसे द्यावेत,आपण ह्याबाबत माणुसकीच्या नात्याने विचार करावा, कारण आपल्या हजारो कोटी च्या सुरक्षा ठेवी बँक मध्ये आहेत तेव्हा त्यातील काही स्वेटर च्या साठी तोडून मुलांना ह्या प्रचंड थंडी मध्ये स्वेटर मिळावेत हीच आमची प्रामाणिक ईच्छा आहे. साहेब आज पुणेकरांन कडून कर प्राप्तीचा उच्चांक गाठला आहे मग का नाही त्यातून थोडी रक्कम स्वेटर साठी निघू शकत. आज आपल्या विद्याथ्र्यांची गरज आहे ती. शिक्षण प्रमुख आणि शिक्षण मंडळ अधिकारी यांची बुद्धी फक्त टेंडर पूर्तीच सिमित आहे का असा प्रश्न पडत आहे. आपण ह्यावर विचार कराल अशी अपेक्षा आहे ,मनपा शाळेतील सर्व गरीब विद्यार्थ्यांना स्वेटर मिळावे ही आपणास आमची नम्र विनंती आहे. जर लवकरात लवकर स्वेटर नाही मिळाले तर आम्ही सर्व रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading