डिश टीव्ही इंडियाने लॉन्च केला आपले वन-स्टॉप OTT मनोरंजन सोल्यूशन
पुणे : आपल्या ओरिजिनल कंटेन्टच्या यशस्वी स्ट्रीमिंगसोबत आता वॉचो काही अत्यंत लोकप्रिय OTT मंचांचे एकत्रित पॅकेज प्रदान करून आपले ऑफरिंग विस्तारित करत आहे आणि अशा प्रकारे आपल्या सब्स्क्राइबर्ससाठी एकाच सब्स्क्रिप्शनमध्ये डिजिटल कंटेन्टचे एक नवीन विश्वच जणू सादर करत आहे.
वॉचो सिंगल लॉगिन आणि सब्स्क्रिप्शन मॉडेल मार्फत डिझ्नी+, हॉटस्टार, झी5, सोनी लिव, लायन्सगेट प्ले, हंगामा प्ले, होईचोइ, क्लिक, एपिकऑन, चौपाल आणि ओहो गुजराती वरील OTT कंटेन्ट ऑफर करेल. त्याशिवाय, सब्स्क्राइबर्स 35+ आकर्षक वेबसिरीज, स्वॅग (UGC कंटेन्ट), चटपटीत शोज सारख्या ओरिजिनल कंटेन्टचा विशाल संग्रह असलेल्या लायब्ररीचा आणि वॉचोच्या लाईव्ह टीव्हीचाही लाभ घेऊ शकतील. डिश टीव्ही आपले प्लान वाढवणार आहे, कारण नजीकच्या भविष्यात आणखीही काही OTT मंच वॉचोशी भागीदारी करणार आहेत, आणि अशाप्रकारे वॉचो एक विस्तृत मनोरंजनाचे डेस्टीनेशन बनणार आहे.
विविध मंचांवरील नवनवीन कंटेन्टचा माग ठेवताना भारतीय OTT प्रेक्षकांची दमछाक होते. वॉचोची ही OTT अॅग्रिगेशन सेवा ‘वन है तो डन है’ या आपल्या वचनाला जागते. या अंतर्गत वॉचो एक प्लान आणि एक पेमेंट पॅकेजची सुविधा प्रदान करून प्रेक्षकांना एकाच ठिकाणी अधिकाधिक कंटेन्ट आरामात उपलब्ध करून देण्यात आणि त्यांचा व्ह्युइंग अनुभव सुधारण्यात मोठे योगदान देते. प्रारंभिक ऑफर (मर्यादित कलावधीसाठी उपलब्ध) म्हणून डिशटीव्ही, डी2एच आणि सीटी केबल सब्स्क्राइबर्सना ही नवीन सेवा एक महिन्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता प्राप्त करता येईल. एकदा सब्स्क्राइब केल्यानंतर प्रेक्षक अॅप किंवा वेबच्या मार्फत मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि टीव्हीवर OTT कंटेन्ट बघू शकतील.
सादर लॉन्चविषयी बोलताना डिश टीव्ही इंडिया लिमिटेडचे ग्रुप CEO श्री. अनिल दुआ म्हणाले, “DTH टेक्नॉलॉजीचे आद्य प्रवर्तक म्हणून डिश टीव्ही इंडियाने भारतीय टेलिव्हिजनचा पट बदलण्यात लक्षणीय भूमिका बजावली आहे. जलद गतीने होत असलेले डिजिटायझेशन, उपभोक्त्यांची बदलती आवड आणि इंडस्ट्री डायनॅमिक्समधील मूलगामी बदल विचारात घेऊन आम्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप्स (OTTs) एकत्र आणून एक पाऊल पुढे टाकत आहोत आणि अशा प्रकारे, वॉचोच्या ऑफरिंगमध्ये भर घालत आहोत. वॉचोच्या या नव्या सेवेच्या मदतीने आम्ही आमचा OTT कंटेन्ट वितरण मंच अधिक सशक्त करून एक सिंगल सब्स्क्रिप्शन गेटवे तयार केला आहे, जो आमच्या सब्स्क्राइबर्सना पैशाचा उत्कृष्ट मोबदला आणि सुलभता देतो. या नवीन सेवा सुरू करून वॉचोला ओरिजिनल कंटेन्टचे, लिनियर टीव्हीचे तसेच ऑन-डिमांड मनोरंजनाचे वन स्टॉप मनोरंजन डेस्टीनेशन बनवण्याचा आमचा मानस आहे आणि जेथे हे वैविध्यपूर्ण मनोरंजन सब्स्क्राइबर्सना कधीही, कुठेही आणि कोणत्याही स्क्रीनवर बघता येईल.”
