Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात; 48 गाड्यांचे नुकसान


पुणे :पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये किमान 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
भीषण अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने ही रस्त्यावरुन बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत होण्यास सुरुवात होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading