Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत समीर सावला, मिनीश रामैया, सरीम खान यांची विजयी सलामी 

पुणे  – रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने व जितेश पतोडिया यांच्या संलग्नतेने आयोजित आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत समीर सावला, मिनीश रामैया, सरीम खान या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
आरसीबीसीच्या स्नूकर हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत बाद फेरीत समीर सावला याने किशोर पंजाबीचा 2-1(75-13, 01-82, 73-40) असा संघर्षपूर्ण पराभव केला. मिनीश रामैयाने दशमेश कार्लावर 2-1(64-24, 52-61, 54-66) असा विजय मिळवला. एकतर्फी लढतीत सरीम खानने प्रतीक वाधवा चा 3-0(73-01, 61-16, 64-32) असा सहज पराभव केला.  स्पर्धेचे उद्घाटन रॉयल कॅनॉट बोट क्लबचे(आरसीबीसी) अध्यक्ष अरूण कुदळे, सचिव मछिंद्र देवकर,आरसीबीसीचे स्पोर्ट्स चेअरमन समीर सावला, जितेश पतोडिया यांच्या करण्यात आले.
;
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी: 
समीर सावला वि.वि.किशोर पंजाबी 2-1(75-13, 01-82, 73-40);
मिनीश रामैया वि.वि.दशमेश कार्ला 2-1(64-24, 52-61, 54-66);
सरीम खान वि.वि.प्रतीक वाधवा 3-0(73-01, 61-16, 64-32). 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading