सावरकर प्रकरणावरून पुण्यात काँग्रेस भवन मध्ये राडा भाजप कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
पुणे:स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
पुण्यात आज भाजप युवा मोर्चाने काँग्रेस भवनामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसून राहुल गांधीं यांच्या पोस्टरला काळं फासून फाडले.
