Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विष्णू याग व जन्मसोहळ्याने श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाची सांगता

पुणे : श्री विष्णू महायाग, उत्तरपूजन व पूर्णाहुती यांसह मुख्य जन्मसोहळ्याने कसबा पेठेतील श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ उत्सवाचा समारोप झाला. श्री विष्णू महायागासोबतच लघुरुद्र, महापूजा, आरती, अष्टोत्तरी शत नामावली यांसारखे धार्मिक विधी मंदिरात पार पडले. उत्सवानिमित्त विद्युतरोषणाई, फुलांची आरास व पणत्यांच्या प्रकाशात मंदिर सजविण्यात आले.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्थापित देवतांचे आवाहन, देवता पूजन आणि दीपप्रज्वलनाने कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाला प्रारंभ झाला होता.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव पार पडला.

श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading