Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

सावरकर यांच्या पुतळ्याजवळ फ्लेक्स लावल्याबद्दल रोहन सुरवसे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : शहरातील सारसबाग जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसकडून फ्लेक्स लावण्यात आले होते.सावरकरप्रेमींनी हे फ्लेक्स हटवले होते. मात्र आता पुणे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. पोलिसांनी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. राज्यातील अनेक भागांतून राहुल गांधी याचा निषेध केला जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सारसबाग जवळ असलेल्या सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावले होते.
पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 153, 504, 188 कलमांतर्गत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading