बालदिना निमीत्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न
पुणे : धनकवडी मोहन नगर येथील वेदांत सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संस्थेच्या अर्ली बर्ड प्री स्कूलमध्ये बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराज, पं. जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांसाह विविध प्राणी ,विविध फळे, फुलपाखरू ,डॉक्टर ,परी आशा वैविध्यपूर्ण वेशभूषेत सहभागी झाले होते संस्थेचे अध्यक्ष राजन बगाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला . याप्रसंगी प्रियांका बगाडे यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी प्राचार्या प्रियांका बगाडे व शिक्षिका राणी थोरात, शिपाई वर्ग व सर्व पालक वर्ग शाळेत उपस्थित होता.
