पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत बेलवलकर बॉबकॅटस, टस्कर्स संघांची विजयी सलामी
पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2022 स्पर्धेत साखळी फेरीत बेलवलकर बॉबकॅट्स, टस्कर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आजचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी क्लबच्या क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत नील बेलवलकर(नाबाद 41धावा व 2-1)च्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर बेलवलकर बॉबकॅट्स संघाने आर्यन स्कायलार्क्स संघावर 60धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बेलवलकर बॉबकॅट्स संघाने 6षटकात 1बाद 102धावा केल्या. यात आत्मन बागमारने 19चेंडूत 2चौकार,6 षटकरासह नाबाद 49धावा, तर नील बेलवलकरने 15 चेंडूत 2चौकार व 4षटकारासह नाबाद 41धावा करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात आर्यन स्कायलार्क्स संघाला 6षटकात 6बाद 42धावाच करता आल्या.यात (प्रसाद जाधव 13, विक्रांत पाटील नाबाद 10 यांनी थोडासा प्रतिकार केला. बॉबकॅट्स कडून नील बेलवलकर 2-1, रोहन जमेनिस 2-15) यांनी सुरेख गोलंदाजी केळी; साकरता आल्या.
दुसऱ्या सामन्यात श्रीनिवास चाफळकर(नाबाद 40धावा) व उदय जाधव(नाबाद 19)यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर टस्कर्स संघाने पँथर्सचा 7गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. पहिल्यांदा खेळताना कर्णा मेहता 49धावा, जयदीप गोडबोले 22धावा, आशिष देसाई नाबाद 11 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर पँथर्स संघाने 6षटकात 3बाद 91धावाकेल्या. या आव्हनांचा पाठलाग करताना टस्कर्स संघाने 5.5षटकात 1बाद 94धावा करून हे आव्हान पूर्ण केले. यात श्रीनिवास चाफळकरने 15चेंडूत 4चौकार व 3षटकार मारत नाबाद 40धाव केल्या. त्याला उदय जाधवने नाबाद 19धावा काढून चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची आवश्यकता असताना उदय जाधवने दोन षटकार व १ चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. .
स्पर्धेचे उदघाटन एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष श्री कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव श्री सारंग लागू, क्रिकेट विभागाचे सचिव श्री. विनायक द्रविड, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, पुसाळकर सुरक्षा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हर्निश राजा, समीर बेलवलकर, तन्मय आगाशे, पुष्कराज व श्रीनिवास चाफळकर, आमिर आजगावकर, इंद्रनील चितळे, संपत हरपाळे, अभिषेक ताम्हाणे, निरंजन गोडबोले, सिद्धार्थ भावे व कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बेलवलकर बॉबकॅट्स: 6षटकात 1बाद 102धावा (आत्मन बागमार नाबाद 49(19,2×4,6×6), नील बेलवलकर नाबाद 41(15,2×4,4×6), ओजस साबडे 4, पार्थ किल्लेदार 1-3)वि.वि.आर्यन स्कायलार्क्स: 6षटकात 6बाद 42धावा(प्रसाद जाधव 13, विक्रांत पाटील नाबाद 10, नील बेलवलकर 2-1, रोहन जमेनिस 2-15); सामनावीर – नील बेलवलकर; बॉबकॅट्स संघ 60धावांनी विजयी;
पँथर्स: 6षटकात 3बाद 91धावा (कर्णा मेहता 49(18,3×4,4×6), जयदीप गोडबोले 22(11), आशिष देसाई नाबाद 11, ईशान तळवलकर 1-16) पराभुत वि.टस्कर्स: 5.5षटकात,1बाद 94धावा (श्रीनिवास चाफळकर नाबाद 40(15,4×4,3×6), उदय जाधव नाबाद 19(9,1×42×6), हर्षल गंद्रे 21, सिध्दार्थ एस 1-24); सामनावीर:- श्रीनिवास चाफळकर; टस्कर्स संघ 7गडी राखून विजयी.
