Wednesday, October 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय बातमी कशी होणार? -खासदार सुप्रिया सुळे

पुणे : खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत.गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेत झालेल्या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय बातमी कशी होणार? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे पुण्यात पत्रकारांशी बोलताना गजानन कीर्तिकारांना लगावला.

राज्यातून ऊर्जा उपकरणांचा एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येच हा प्रकल्प बाहेर गेल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर उत्तर देताना ही जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “प्रकल्प राज्याबाहेर जाणं ही त्या त्या वेळच्या सरकारचीच जबाबदारी असते.तुम्ही मायबाप सरकार आहात. जो सरकारमध्ये बसलेला असतो, त्याच्यावरच जबाबदारी असते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इतिहास हा करमणुकीसाठी नाही, इतिहासाची तोडफोड नको, बांधल कुटूंबाबाबत नेमकं काय दाखवले आहे? हे सर्व सगळ्या इतिहासचे साक्षीदार आहेत, ते छत्रपती शिवाजीराजांशी एकनिष्ठ होते, विश्वासू होते, इतिहासानुसार जे सत्य आहे ते दाखवले पाहिजे, मात्र हा सिनेमा छत्रपती विरोधी आहे. आपण काही इतिहासकारांना बसवूया, यात राजकारण नाही करायचं, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, विरोधी सिनमे खपवून घेतले जाणार नाही.असे परखड मत सुळे यांनी व्यक्त केले.
सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिपण्णीवरही भाष्य केले. सुळे यावेळी म्हणाल्या की, बावनकुळे अंधश्रद्धावर बोलतात, अंधश्रद्धेच्या प्रश्नावर ज्यामध्ये दाभोळकर यांना जीव गमवावा लागतो, दुसरीकडे आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांना असे बोलले जातंय, ही यांची संस्कृती आहे.”

Leave a Reply