भारत जोडो यात्रा : कॉंग्रेस नेते राहुल गांधीसोबत आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी
नांदेड : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. तर आज कोंग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार व शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे या यात्रेत सहभागी झाले. नांदेड येथे सुरू असलेल्या या यात्रेत आज राहुल गांधीसह हे युवा नेते सहभागी झाल्याने देशातील तरुण नेतृत्व एकत्र आल्याचे चित्र आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे. सुरुवातील आदित्य ठाकरे हे नांदेमध्ये दाखल झाले होते, त्यानंतर ते हिंगोलीत पोहचले आहेत. आदित्य ठाकरे हे यात्रेबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधीसोबत ते हिंगोलीला जाणार आहेत. तसेच यात्रेत देखील सहभागी होऊन लोकांबरोबर, राहुल गांधीसोबत चालणार आहेत. सकाळी राहुल गांधी यांचे स्वागतासाठी दोन क्विंटल फुलांचा सडा कित्येक फूट शिंपून सेनी येथे ग्रामस्थांनी जमा केले. नांदेड जिल्ह्यातील अभूतपूर्व गर्दी, लोकांचा उत्साह आणि सहभागानंतर सायंकाळी यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला.
देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत. अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.
