Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग

नांदेड : येथील देगलूरनाका येथे भारत जोडो यात्रा पोहचली असून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी आहेत. यावेळी यात्रेत सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत स्वःत सेल्फीही घेतली.काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी येथून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आहे. काॅंग्रेसचा मित्रपक्ष असलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा समावेश नसेल हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाले. ते राहुल गांधी यांच्यासह चालताना दिसले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading