Monday, June 15, 2026
Latest NewsSports

निंबाळकर वॉरीयर्स संघाची विजयाची हॅट्रीक; फन फिटनेस संघाचा दुसरा विजय !

दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा
पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत निंबाळकर वॉरीयर्स संघाने विजयाची हॅट्रीक नोंदविली. फन फिटनेस संघाने स्पर्धेत दुसरा विजय मिळवला.

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी मैदान, मुकूंदनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत गौरव खैरे याच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर निंबाळकर वॉरीयर्स संघाने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा १०४ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना निंबाळकर वॉरीयर्स संघाने २५३ धावांचा डोंगर उभा केला. गौरव खैरे याने ५७ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११६ धावांची खेळी केली. गौरव याच्यासह विराज दारवटकर याने ६४ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. तिसर्‍या गड्यासाठी विराज आणि गौरव यांनी ४० चेंडूत १०९ धावांची भागिदारी केली. या आव्हानाला उत्तर देताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव १४९ धावांवर मर्यादित राहीला.

इशान खोंड याच्या नाबाद १०५ धावांच्या जोरावर फन फिटनेस संघाने युनिक स्पोर्ट्स क्लबचा ४२ धावांनी पराभव केला. फन फिटनेस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात १९५ धावा धावफलकावर लावल्या. इशान खोंड याने ५८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना युनिक स्पोर्ट्स क्लबचा डाव १५३ धावांवर मर्यादित राहीला. अभिजीत येवले याने नाबाद ६९ धावा करून एकहाती प्रतिकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
निंबाळकर वॉरीयर्सः २० षटकात ३ गडी बाद २५३ धावा (गौरव खैरे नाबाद ११६ (५७, १७ चौकार, ४ षटकार), विराज दारवटकर ६४ (२४, ५ चौकार, ५ षटकार), अनुराग कवाडे ३२, हर्षल राजपुत २४, राज शुक्ला २-४८);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी गौरव आणि अनुराग ७७ (४५); दुसर्‍या गड्यासाठी हर्षल राजपुत आणि गौरव ६५ (३२); तिसर्‍या गड्यासाठी विराज आणि गौरव १०९ (४०) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः २० षटकात ८ गडी बाद १४९ धावा (राज शुक्ला ३५, आर्यन भोसले २५, अविराज गावडे ३-२२); सामनावीरः गौरव खैरे;

फन फिटनेसः २० षटकात ५ गडी बाद १९५ धावा (इशान खोंड नाबाद १०५ (५८, १३ चौकार, २ षटकार), अजय आर. २२, संतोष पाटोळे १-३४) वि.वि. युनिक स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ४ गडी बाद १५३ धावा (अभिजीत येवले नाबाद ६९ (४८, ६ चौकार, ३ षटकार), ओम साळुंके ३२, साईश दिक्षे १-२८); सामनावीरः इशान खोंड;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading