Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अफजल खानाचे कबरी जवळचे अनिधिकृत बांधकाम पाडले

सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणावर आज प्रशासनाचा हातोडा पडला आणि चर्चांना एकच उधाण आलं. आजच्याच दिवशी १० नोव्हेंबर १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. आणि अगदी याच तारखेला अफजल खानाच्या कबरी जवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झालीये.

प्रतापगडावर सुरू असलेल्या कारवाईबाबत राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासन यांनी अत्यंत गुप्तता बाळगली. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होवू नये याचकरिता ही खबरदारी घेण्यात आल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. आम्ही हे ठरवून केलेलं नाही. आजच्या तारखेचा योगायोग नसून २०१७ च्या हायकोर्टाचा आदेशाचं पालन करत हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत असल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं.
प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरी भोवतालचं बांधकाम पाडणं हा विषय एकदम संवेदनशील आहे. यामुळे पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत ही कारवाई सुरू केली. जिल्ह्यातून सुमारे ३ पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading