Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

डाबर मेस्वाककडून डिजिटल गणपती म्युरलची एनएफटी सादर

पुणे : भारतातील आघाडीची विज्ञानाधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने आपल्या आघाडीच्या टूथपेस्ट ब्रँड डाबर मेस्वाकसाठी सर्वप्रथम एनएफटी लाँच करत आज मेटाव्हर्स/नॉन-फंगिबल टोकन किंवा एनएफटी (NFT) क्षेत्रात पदार्पण केले.

डाबर मेस्वाकसह एकत्रितपणे आनंद साजरा करण्यासाठी देशभरातील लोकांकडून क्राउडसोर्स केलेली हाऊस ऑफ डाबरची ही पहिली एनएफटी ही सर्वात मोठी डिजिटल स्वरुपातील गणपती म्युरल आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स युनियनने त्याला प्रमाणित केले आहे.

डाबरच्या सोशल मीडिया हँडल्सवर गणपती बाप्पासोबत त्यांच्या आवडीचे क्षण सहप्रचित करण्याचे आवाहन डाबर मेस्वाकने नुकतेच केले होते. या मेगा डिजिटल मोहिमेचा एक भाग म्हणून या एनएफटीची निर्मिती करण्यात आली आहे.

कोव्हिड१९ महामारीमुळे दोन वर्षांनंतर साजरा केल्या जाणाऱ्या सणासुदीच्या काळात डाबर या ब्रँडविषयी आपुलकी आणि  मेस्वाक औषधी वनस्पतीचे वेगळेपण साजरे करण्यासाठी ग्राहकांना संधी मिळावी याकरिता एनएफटी मार्केटप्लेसवर सर्वात मोठी गणपती म्युरलची निर्मिती करण्यात आली. डिजिटल समुहाचा एकत्रितपणा आणि एकतेचे प्रतीक म्हणून ही एनएफटी भारताच्या केंद्र सरकारकडे सुपूर्त करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

डाबर इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहित मल्होत्रा म्हणाले: “डाबर मेस्वाक हा नैसर्गिक टूथपेस्टचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. एनएफटीची भुरळ संपूर्ण जगाला पडली आहे.  एनएफटीमुळे केवळ संग्रहणीय क्षेत्रात क्रांती होत आहे असे नाही. ब्रँड्सशी संलग्न आणि अर्थपूर्ण संवाद साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी एनएफटी हे एक नवीन माध्यम बनत आहे. आमच्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या अपार प्रेम व प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून तसेच अनंत काळापर्यंत स्मरणात राहील अशा डिजिटल आर्टच्या स्वरुपात डाबर मेस्वाकच्या लाखो ग्राहकांच्या हसतमुख छायाचित्रे व प्रतिमा एनएफटीच्या माध्यमातून रुपांतरित करण्यात आल्या आहेत.”

काॅइनअर्थ (Koinearth) यांनी डाबरला एनएफटी मार्केटप्लेसवर सर्वात मोठे गणपती म्युरलच्या निर्मितीसाठी मदत केली. (https://ngagen.com/daburmeswak)

डाबर इंडिया लिमिटेड कंपनीविषयी: डाबर इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. १३९ वर्षांच्या गुणवत्ता आणि अनुभवाच्या वारशावर उभारलेले, डाबर हे आज भारतातील सर्वात विश्वासार्ह नाव आणि जगातील सर्वात मोठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आरोग्य सेवा कंपनी आहे. डाबर इंडियाच्या एफएमसीजी पोर्टफोलिओमध्ये नऊ पॉवर ब्रँडचा समावेश आहे: डाबर चवनप्राश, डाबर हनी, डाबर होनिटस, डाबर लाल तेल आणि डाबर पुदिन हारा हे हेल्थकेअर श्रेणीतील; पर्सनल केअर स्पेसमध्ये डाबर आमला, वाटिका आणि डाबर रेड पेस्ट; आणि अन्न आणि पेय श्रेणीतील रिअल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading