आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड: ७४० कोटी रुपयांचा आयपीओ शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी खुला होणार
- प्राईस बँड प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ६१ ते ६५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
आयनॉक्स विंड लिमिटेडची उपकंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण ७४० कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेयर्स यामध्ये असणार आहेत.
या आयपीओमध्ये ३७० कोटी रुपयांचे नव्याने जारी करण्यात आलेले इक्विटी शेयर्स तर ३७० कोटी रुपयांचे विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेयर्स असणार आहेत. हा पब्लिक इश्यू मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२ रोजी बंद होईल.
या आयपीओचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर ६१ ते ६५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २३० इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येऊ शकेल आणि त्यापुढील बोली २३० च्या पटीत लावावी लागेल. अँकर गुंतवणूकदारांना गुरुवार, १० नोव्हेंबर २०२२ रोजी बोली लावता येईल.
नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्समधून उभारली जाणारी रक्कम पुढील कारणांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे: कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड, यामध्ये सिक्युअर्ड एनसीडीच्या संपूर्ण रिडम्प्शनचा देखील समावेश असेल. त्याचप्रमाणे बाकीची रक्कम सर्वसामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल. शेअर बाजारांमध्ये इक्विटी शेयर्सच्या लिस्टिंगचे लाभ कंपनीला मिळतील.
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील एक प्रमख पवन ऊर्जा संचालन व देखभाल सेवा प्रदान करणारी कंपनी असून तिची सुरुवात २०१२ साली झाली. पवन ऊर्जा प्रकल्पांना दीर्घकालीन संचालन व देखभाल सेवा पुरवण्याच्या व्यवसायात ही कंपनी कार्यरत असून, खासकरून विंड टर्बाईन जनरेटर्ससाठी संचालन व देखभाल सेवा तसेच पुलिंग स्टेशन्स आणि ट्रान्समिशन लाईन्ससारख्या डब्ल्यूटीजीमधून पॉवर इव्हॅक्युएशनमध्ये मदत करणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम ही कंपनी करते. दीर्घकालीन संचालन व देखभाल कंत्राटे असल्याने या कंपनीचे वार्षिक उत्पन्न स्थिर आहे. ही कंपनी आयनॉक्स विंड लिमिटेडची उपकंपनी आहे, तसेच आयनॉक्स जीएफएल कंपनी समूहाचा एक भाग आहे. या दोन्हींसोबतचे परस्परपूरक संबंध या कंपनीसाठी लाभदायक आहेत. ३० जून २०२२ च्या आकडेवारीनुसार, आयनॉक्स ग्रीनच्या संचालन व देखभाल सेवा पोर्टफोलिओमध्ये एकूण २७९२ मेगावॅट विंड फार्म क्षमता आणि १३९६ डब्ल्यूटीजी यांचा समावेश आहे. ३० जून २०२२ रोजी त्यांच्या संचालन व देखभाल कंत्राटांच्या पोर्टफोलिओमध्ये भारतातील पवनस्रोतांनी परिपूर्ण आठ राज्यांमध्ये २७९२ मेगावॅट पवन प्रकल्पांचा समावेश आहे (व्यापक ओअँडएम कॉन्ट्रॅक्ट आणि सर्वसामान्य पायाभूत ओअँडएम कॉन्ट्रॅक्ट). त्यांच्या प्रकल्पांचा उर्वरित जीवनकाळ २० वर्षांपेक्षा जास्त आहे. कंपनीने ज्यांच्यासोबत संचालन व देखभाल कंत्राटे केली आहेत त्यांमध्ये स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (आयपीपी) (जवळपास ७२%), सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) (जवळपास १४%) आणि कॉर्पोरेट्स (जवळपास १४%) यांचा समावेश आहे (३० जून २०२२ नुसार).
या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स एडेलवीज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, डीएएम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेड, इकिरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि सिस्टिमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड हे आहेत.
या रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेयर्स बीएसई आणि एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
