Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

आर्चेन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) ९ नोव्हेंबर पासून खुली होणार

आर्चेन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (“ACIL” किंवा “कंपनी”)ने प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्राथमिक समभाग विक्रीमध्ये ८,०५०.०० दशलक्ष (“फ्रेश इश्यू”) पर्यंतचे इक्विटी शेअर्सचे नवीन इश्यू आणि १६,१५०,००० इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर (“विक्रीची ऑफर” आणि फ्रेश इश्यूसह एकत्रितपणे “ऑफर”) आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख सोमवार, ७ नोव्हेंबर २०२२ असेल. ही योजना शुक्रवार, ११  नोव्हेंबर २०२२ रोजी बंद होईल.

प्रत्येक समभागासाठी (इक्विटी समभाग) रु.३८६ ते रु. ४०७ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ३६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ३६ च्या पटीत लावता येणार आहे.

एआयसीएलने फ्रेश इश्यूचे निव्वळ उत्पन्न निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे (i) कंपनीने जारी केलेल्या ६,४४०.०० दशलक्ष रुपये किमतीच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरचे (“NCDs”) काही अंशी किंवा पूर्ण असे विमोचन किंवा पूर्व विमोचन; आणि (ii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी शिल्लक रक्कम (“ऑफरच्या वस्तू”).

विक्रीच्या ऑफरमध्ये केमिकास स्पेशॅलिटी एलएलपी (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) द्वारे  २,०००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि इंडिया रिसर्जन्स फंड, स्कीम I द्वारे ३,८३५,५६२ पर्यंतचे इक्विटी शेअर्स,  इंडिया रिसर्जन्स फंड, स्कीम II द्वारे ६,४७८,८७६ पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पिरामल नॅचरल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे ३,८३५,५६२ पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “गुंतवणूकदार विक्री समभागधारक” आणि प्रवर्तक विक्री समभागधारक यांसह ” विक्री समभागधारक” ) यांचा समावेश आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे (the “RoC”) (the “RHP”) रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे दाखल केलेल्या ३१  ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे इक्विटी शेअर्स सादर केले जात आहेत आणि BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्देशांसाठी, नियुक्त स्टॉक एक्सचेंज NSE असेल.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(२) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी नेट ऑफरच्या किमान ७५% पेक्षा कमी नसलेल्याना समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”)  राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि बिगर संस्थात्मक भागांतर्गत बिगर संस्थात्मक बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असलेले इक्विटी शेअर्स, खालील गोष्टींच्या अधीन असतील: (i) एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,०००  रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ii) दोन तृतीयांश भाग १,०००,०००  रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल, अर्थात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही उपविभागातील सबस्क्राईब न झालेल्या भागाची वाटणी बिगर -संस्थात्मक बोलीदारांच्या इतर उप-श्रेणीमधील अर्जदारांमध्ये होऊ शकेल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार योजनेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे  ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलवार माहितीसाठी रेड हेंरिंग प्रॉस्पेक्टसच्या ३६७ पानावर सुरू होणारे “ऑफर प्रोस्युजर” बघा.

आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading